मुळच्या सोलापूरच्या व यमगर वाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरु केलेल्या शाळेतील पहिल्या विद्यार्थी राजश्री ज्ञानेश्वर काळे या आज प्रभाग ७ अ मधून निवडून आल्या. त्या भाजपकडून निवडणुकीला उभे होते. राजश्री काळे या राज्यातील पहिल्या पारधी समाजातील नगरसेविका ठरल्या आहेत. शिपाई ते नगरसेवक या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वाकडेवाडी येथील राहणाऱ्या व गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून त्या काम करतात. पहिल्यांदा निवडणुक लढ़वली आणि विजयी झाले. मी पारधी समाजातील पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा होता. काळानुरूप बदल होत गेला आणि समाजाने स्वीकारले. समाजासाठीही मी मागील पाच वर्षांपासून तळागळापर्यंत काम केले आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत झाला. या पुढील काळात समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध काम करू लागल्या, यमगर वाडीत त्या शिकत होत्या. रात्रशाळेतून त्यांनी नववी पर्यंतचे शिक्षण घेतले. राजश्री काळे या सुरवातीपासून संघाचे काम करू लागल्या. त्यांनी राजश्री आदिवासी पारधी संस्था स्थापन केली आहे.