बारा कोटींच्या खर्चाला स्थायी समितीकडून मान्यता

पुणे : मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करून ते पूर्ववत करण्याच्या नावाखाली पुन्हा महापालिके कडून उधळपट्टी सुरू झाली आहे. त्यासाठी आठ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून येत्या काही दिवसांत डांबरीकरण तसेच खोदाई झालेले रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. डांबरीकरणा व्यतिरिक्त रस्ते पूर्ववत करण्यासाठी चार कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. मात्र रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणावर तब्बल १२ कोटींचा खर्च झाल्यानंतर रस्त्यांचा दर्जा सुधारणार का, हा प्रश्न कायम आहे.

लक्ष्मी रस्ता, के ळकर रस्ता,

कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव आणि शिवाजी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठीची प्रक्रिया पथ विभागाने सप्टेंबर महिन्यात सुरू के ली होती. त्यासाठी पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही कामे सुरू करून ती पूर्ण करण्याचा आग्रह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून धरण्यात आला होता. मात्र रस्ते दुरुस्तीसाठी पथ विभागाकडे चार कोटींचाच निधी शिल्लक असल्याने डांबरीकरणाची कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्न पथ विभागातील अधिकाऱ्यांना पडला होता. त्यामुळे डांबरीकरणाची कामे लांबणीवर पडण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबरोबरच अन्य भागातील रस्ते पूर्ववत करण्यासाठी एकू ण बारा कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यापैकी आठ कोटी रुपये डांबरीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत महापालिके च्या पथ विभाग आणि मलनिस्सारण विभागाकडून विविध वाहिन्या टाकण्याची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आली. विशेषत: मध्यवर्ती भागात या प्रकारची कामे मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली. के ळकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता या प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली.

ही कामे टाळेबंदी उठल्यानंतरही सुरूच राहिल्याने महापालिके ला मोठय़ा प्रमाणात टीके ला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात महापालिके ने रस्ते खोदाई के लेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी के ली होती. खोदलेल्या भागात के वळ काँक्रिटीकरण करण्यात आले होते. पावसाळा संपल्यानंतर मध्यवर्ती भागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे महापालिके च्या पथ विभागाने जाहीर के ले होते.

ठेके दारांना पाठीशी घालण्याचा प्रकार

महापालिके च्या पथ विभागाने काही दिवसांपूर्वीच ठेके दार नियुक्त करून रस्ते पूर्ववत करण्याची कामे के ली होती. त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. वास्तविक महापालिके च्या नियमानुसार काम निकृष्ट दर्जाचे झाले तर त्याची जबबादारी संबंधित ठेके दारावर असते. त्याच्याकडूनच ही कामे पुन्हा पूर्ण करून घेणे अपेक्षित असताना महापालिके ने नव्याने त्यासाठी खर्चाचा घाट घालत ठेके दारांनाही पाठीशी घातले आहे.

तात्पुरत्या मलमपट्टीसाठी उधळपट्टी

रस्ते पूर्ववत करण्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कु णाल खेमनार यांच्यासह भाजप नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामांची गेल्या आठवडय़ात पाहणी के ली होती. त्यानुसार डांबरीकरणाची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. टाळेबंदीच्या कालावधीत रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई के ल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याच्या कामात दिरंगाई झाली होती. त्यावरून टीका झाल्यानंतर रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च महापालिके ने के ला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पावसात रस्ते दुरुस्तीवर के लेला खर्चही वाया गेल्याचे स्पष्ट झाले होते.

रस्ते दुरुस्तीच्या निकृष्ट कामांबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसांत महापालिका अधिकारी आणि ठेके दारांची संयुक्त बैठक घेऊन जबाबदारी निश्चित करण्यात येईल. निकृष्ट काम करणाऱ्या ठेके दारांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, वाहनचालकांना त्रास होईल, यापद्धतीने कामे न करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.

हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका