पुणे : महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून वर्षभरात २ लाख २२ हजार ७७४ अधिकृत जाहिरात फलक, कापडी फलक, बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १४९ जाहिरात फलक, ५० हजार १२० बोर्ड, २९ हजार १५ कापडी फलक, १० हजार २५१ झेंडे, ६० हजार ३२० भित्तीपत्रके, २६ हजार १५ किऑक्स आणि अन्य १६ हजार ९२५ लहान मोठ्या फलकांचा समावेश आहे. दरम्यान, जाहिरात फलक उरविण्याची (निष्कासन) कारवाईपोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेकडून अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर, कापडी फलक, भित्तीपत्रके, झेंड्यांवर निष्कासन कारवाई करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाई यापुढेही कायम राहणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाहिरात फलक, भित्तीपत्रके आणि कापडी फलक लावणाऱ्यांवर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास त्यावर ज्या कंपनीची जाहिरात आहे, त्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. विना परवाना भित्तीपत्रके, कापडी फलक लावल्यास मांडव व्यवसाय आणि फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायधारकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc took action against over 2 lakh illegal banners and hoardings pune print news zws
First published on: 19-08-2022 at 21:35 IST