पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून संप सुरू केला आहे. या संपाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील किमान बारा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची पीएमपी प्रमुख सार्वजनिक सेवा आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा काही मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका शालेय विद्यार्थी, नोकरदारांना बसला.

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ
Mumbai to Kudal, tough journey,
मुंबई ते कुडाळ २० तासांचा खडतर प्रवास
thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
Mumbai, Atal Setu, vehicles passed through Atal Setu,
मुंबई : अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, सात महिन्यांत गाठला ५० लाखांचा टप्पा

हेही वाचा…अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मिळणार नुकसान भरपाई…

दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असून चर्चेला सुरूवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.