पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महिला प्रवाशांसाठी १९ मार्गांवर पीएमपीने विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी १९ मार्गांवर २४ विशेष गाड्या (तेजस्विनी सेवा) धावणार आहेत. गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपीमधून प्रवास करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून या गाड्यांमध्ये महिला वाहकांची नियुक्ती केली जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील किमान दहा लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. यामध्ये महिला प्रवाशांचे ही मोठे प्रमाण आहे. पीएमपीच्या दैनंदिन संचलनात दीड हजार गाड्या असून काही मार्गांवरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळी आठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ या गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना प्रवास करणे अडचणीचे ठरत असल्याने खास महिलांसाठी तेजस्विनी सेवा सुरू करण्यात आली आहे. यानुसार काही ठरावीक कालावधीतच महिलांसाठी तेजस्विनी सेवा आहे. मात्र आता या सेवेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. महिला प्रवाशांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Pune-Daund suburban service,
रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा >>> पिंपरीतील नागरी प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल

स्वारगेट-येवलेवाडी, स्वारगेट-हडपसर, अप्पा बळवंत चौक-सांगवी, महापालिका भवन-लोहगांव, कोथरूड डेपो-विश्रांतवाडी, कात्रज-महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज-कोथरूड डेपो, हडपसर-वारजे माळवाडी, भेकराईनगर-महापालिका भवन, हडपसर-वाघोली (केसनंद फाटा), अपर डेपो-स्वारगेट, अपर डेपो-पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन-आकुर्डी रेल्वे स्थानक, निगडी-पुणे रेल्वे स्थानक (औंध मार्गे), निगडी-भोसरी, निगडी-हिंडवडी माण फेज-३, चिंचवडगांव-भोसरी, चिखली-डांगे चौक या मार्गावर महिलांसाठी विशेष सेवा असणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या गाड्या केवळ महिला प्रवाशांसाठीच राखीव असणार असून, दुपारच्या वेळेत त्यातून सर्वांना प्रवासा करता येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.