scorecardresearch

पुणेकरांचे हाल : प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, पीएमपीच्या ७०० बस गाड्या आज रस्त्यावर उतरल्याच नाहीत; कारण…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात.

Pune Bus
पुणे पिंपरीतील सार्वजनिक सेवा काही प्रमाणात विस्कळीत ( फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी पीएमपीला भाडेतत्वावर गाड्या पुरविणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप सुरू केला आहे. त्यामुळे सातशे गाडया रस्त्यावर येऊ न शकल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात. पीएमपीने गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम तातडीने न दिल्यास सेवा बंद करण्यात येईल, असे पत्र ठेकेदारांकडून पीएमपी प्रशानसाला देण्यात आले होते. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांपैकी निम्म्या गाड्या ठेकेदारांच्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासूनची रक्कम मिळाली नसल्याचा दावा ठेकेदारांकडून करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संचलन तूट पीएमपीला देण्यात येते. त्यातून विविध रक्कम अदा केली जाते. ठेकेदारांना थकीत ९९ कोटी ९३ लाख १४ हजार २४९ रुपये देणे आहे. यापैकी काही दिवसांपूर्वी ६६ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही गाडया पुरवठादार ठेकेदारांनी गाड्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. दरम्यान ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदेलनाचा इशारा दिला आहे.

आठ ठेकेदारांकडून ८४० गाड्या पुरविण्यात येतात. त्यापैकी सातशेहून अधिक गाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठेकेदारांना मेस्सा कायद्याअंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pmpml bus contractor goes on strike 700 bus goes out of service pune print news scsg

ताज्या बातम्या