पुणे: 'पीएमआरडीए'कडून वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये व्यापारी गाळे उपलब्ध; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन | PMRDA appeals to apply online due to the availability of commercial plots in Walhekarwadi Chinchwad pune print news amy 95 | Loksatta

पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये व्यापारी गाळे उपलब्ध; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

व्यापारी गाळे विकत घेण्याच्या या प्रक्रियेत जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे आणि मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये व्यापारी गाळे उपलब्ध; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
(संग्रहित छायाचित्र)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) पेठ क्रमांक ३० वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील कन्व्हिनिअन्स शॉ़पिंग सेंटरमधील एकूण ३१ व्यापारी गाळ्यांची ८० वर्षांकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>पुणे:‘नदीकाठ’ योजनेसाठी पुन्हा पर्यावरणीय मंजुरी प्रक्रिया?

त्यापैकी तळमजल्यावर सात व्यापारी गाळे असून त्याकरिता ८७ हजार १०० प्रति चौरस मीटर, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर २४ व्यापारी गाळे असून त्याकरिता ८० हजार ४०० प्रति चौ.मी. आधारभूत दर आहेत. पेठ क्र. ३० येथील तळमजल्यावरील व्यापारी गाळ्यांचे कमीत कमी क्षेत्र १३.६० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत ११ लाख ८४ हजार ५६० रुपये आहे. जास्तीत जास्त क्षेत्र २२.५० चौ.मी. असून त्याची आधारभूत किंमत १९ लाख ५९ हजार ७५० रुपये आहे.

हेही वाचा >>>पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह

इच्छुक व्यक्तींनी ई-लिलाव प्रक्रियेसंबंधीची सूचना, सविस्तर अटी व शर्ती यांच्या माहितीसाठी https://eauction.gov.in व http://www.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जासोबत आधारभूत किमतीच्या दहा टक्के अनामत रक्कमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) कार्यालयास सादर करायचा आहे. व्यापारी गाळे विकत घेण्याच्या या प्रक्रियेत जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी व्हावे आणि मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-२७६५२९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सह आयुक्त स्नेहल बर्गे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:07 IST
Next Story
पुणे:‘नदीकाठ’ योजनेसाठी पुन्हा पर्यावरणीय मंजुरी प्रक्रिया?