‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी

पिंपरी: ठेकेदारासोबत आलेल्या एकाने परवानगीविना दालनात घुसून  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या मुख्य  अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १६ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात  घडली. तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे. वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा. Register Now Skip Already have an account? Sign in […]

crime-2
विद्यापीठाच्या आवारात तोडफोड प्रकरणी अभाविपच्या २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा (प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता)

पिंपरी: ठेकेदारासोबत आलेल्या एकाने परवानगीविना दालनात घुसून  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या मुख्य  अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १६ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात  घडली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण, आजपर्यंत ३३ कारवाया

याप्रकरणी अशोक मारूतीराव भालकर  (वय ५५, रा.शिवाजीनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र जगताप (वय ४५, पूर्णनाव व पत्ता समजू शकला नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भालकर हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात मुख्य  अभियंता या पदावर कार्यरत आहेत. १६ मार्च रोजी त्यांच्या दालनात बैठक सुरू होती. बैठक संपत असताना मुख्य ठेकेदार कुणाल भोसले यांच्या सोबत आलेला आरोपी रामचंद्र हा परवानगीविना दालनात घुसला. भालकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्हाला बघून घेतो असा आरडाओरडा करून गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 18:28 IST
Next Story
मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही: आमदार रविंद्र धंगेकर
Exit mobile version