पुणे : कच्च्या मालाच्या तुटवडय़ामुळे पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तर किलोमागे  दोन ते तीन रुपयांनी ही वाढ झाली आहे. कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे दर तेजीत राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरापासून जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यान्नाच्या दरात वाढ होत चालली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलांचे दर तेजीत आहेत. इंधन दरवाढीमुळे बहुतांश सर्व अन्य मालाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पोह्यांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो पोह्यांच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याची माहिती ‘मार्केट यार्ड‘मधील व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poha price increase by 2 to 3 rs on one kg zws
First published on: 07-07-2022 at 04:14 IST