सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी सर्व गणेश मंडळांनी घ्यावी. गणेशोत्सवात केला जाणारा अमाप खर्च टाळून समाजकार्यावर भर द्यावा. मांडवाबाबत न्यायालय आणि पालिकेच्या नियमांचे पालन करावे. गणेशोत्सवापूर्वी शहराच्या विविध भागासह उपनगरांमध्ये ढोल-ताशा पथकांच्या वादन सरावामुळे सामाजिक शांतता भंग होते. याबाबत अनेक नागरिकांच्या दरवर्षी तक्रारी येतात. या पाश्र्वभूमीवर यंदा ढोल-ताशा पथकांच्या सरावावर कठोर निर्बंध घालण्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले असून गणेश मंडळांनी नियमांच्या अधिन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिल्या आहेत.

आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिस आणि महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत सेनगावकर यांनी हे आदेश दिले. महापौर मुक्ता टिळक, विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त ज्योतीप्रज्ञा सिंग, वाहतूक शाखेचे उपआयुक्त अशोक मोराळे, परिमंडळ दोनचे उपआयुक्त डॉ. प्रवीण मुंढे, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

bmc 1400 crores cleaning contract case
१४०० कोटींचे कंत्राट प्रकरण: महापालिकेकडून सरकारी धोरणाचे उल्लंघन केले जात असल्यास काय करणार? उच्च न्यायालयाची विचारणा
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही

सेनगावकर म्हणाले, रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यासंदर्भात राज्यशासनाच्या अध्यादेशाचे पालन केले जाईल. विविध परवानग्या देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार असून गणेश मंडळांसाठीची नियमावली पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

टिळक म्हणाल्या,‘ यंदाच्या गणेशोत्सवासाठी पालिकेच्यावतीने अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्सव दिमाखात साजरा करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना पालिका प्रशासनाकडे पाठवाव्यात. त्यातील योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल.’

गोडसे म्हणाले,‘ कायद्याच्या कचाटय़ात सापडलेला गणेशोत्सव सुरळीत व उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळांनी वेळेत सर्व परवानग्या घ्याव्यात.’  गणेश मंडळांनी वृक्षारोपण करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.