scorecardresearch

Premium

पुण्यात भाजपा नगरसेवकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की, सराईत अटकेत

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या अंगरक्षकाला सराईताने धक्काबुक्की केल्याची घटना आंबिलओढा वसाहतीत घडली.

arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या अंगरक्षकाला सराईताने धक्काबुक्की केल्याची घटना आंबिलओढा वसाहतीत घडली. यानंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सराईतास अटक केली. विकी उर्फ अतुल वामन क्षीरसागर (रा. आंबिलओढा वसाहत, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस शिपाई अमोल शिंदे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही महिन्यांपूर्वी घाटे यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर घाटे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पोलीस शिपाई शिंदे नगरसेवक घाटे यांचे अंगरक्षक आहेत. हनुमान जयंतीनिमित्त आंबिलओढा वसाहतीत आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमाला घाटे उपस्थित होते. त्यावेळी घाटे यांच्या बरोबर असलेला सहकारी महेश आवळेशी आरोपी क्षीरसागरने वाद घालण्यास सुरुवात केली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा : पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

पोलीस शिपाई शिंदे यांनी महेश आवळे आणि आरोपी क्षीरसागर यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी क्षीरसागर पोलीस शिपाई शिंदे यांच्या अंगावर धावून गेला. ‘तू मला कोण सांगणार’, असे सांगून त्याने शिंदे यांना धक्काबुक्की केली. शिंदे यांच्या दंडावर ओरखडले, असा आरोप आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी क्षीरसागरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कस्पटे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police arrest accused for manhandling with security of bjp corporator in pune print news pbs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×