पुणे : सराफी पेढीत शिरून सराफावर शस्त्राने वार करून पसार झालेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरव विजय रायकर (वय २५, रा. पोकळे वस्ती, धायरी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. विनोदकुमार सोनी (वय ४२, रा. आंबेगाव बुद्रूक) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. कात्रज परिसरातील आंबेगाव बुद्रुकमध्ये सोनी यांचे वैभवलक्ष्मी ज्वेलर्स सराफी पेढी आहे. दोन दिवसांपूर्वी रायकर आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. सराफ व्यावसायिक सोनी यांच्यावर चाकूने वार केले. पेढीतील दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सोनी यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. संशयित चोरटा रायकर धायरी परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले.पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धीरज गुप्ता, रवींद्र चिप्पा, गणेश भोसले, आकाश फासगे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested a robber of jewelry shop in katraj print news asj
First published on: 22-05-2022 at 16:16 IST