वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालकाला पोलिसांनी अटक केली. डंपरवरील चालक मद्यप्राशन करत असल्याची माहिती मालकाला होती. निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली. अनिल काटे (वय ३९, रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे डंपर मालकाचे नाव आहे. वाघोलीतील केसनंद फाटा सोमवारी मध्यरात्री भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. अपघातात सहा जण जखमी झाले. पदपथावर झाेपलेले सर्व जण अमरावती जिल्ह्यातील असून, ते मजुरीसाठी पुण्यात आले होते. अपघात प्रकरणात वाघोली पोलिसांनी सोमवारी डंपर चालक गजानन शंकर तोटरे (वय २६, सध्या रा. केसनंद, मूळ रा. पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड) याला अटक केली. त्याला न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> पुण्यासाठी दोन महापालिका आवश्यक, निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची चंद्रकांत पाटील यांची भूमिका

Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ganesh Naik announcement create unease in Shiv Sena
ठाण्यात फक्त कमळ ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
tigress who is worried about her cub disappearing is got panic
चवताळलेल्या वाघीणीच्या डरकाळ्या सुरू, सुरक्षा म्हणून रस्त्याला बॅरिकेट्स…
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
bhandara jawahar nagar ordnance factory blast update eight dead
भंडारा स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू, प्रशासनाकडून चार जणांची नावे जाहीर

याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी डंपर मालक अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविले. डंपर चालक तोटरे याला दारु पिण्याचे व्यसन होते. याबाबतची माहिती डंपर मालक काटे याला होती, अशी माहिती तपासात मिळाली. डंपर चालक तोटरे याने डंपरमधील माल आव्हाळवाडी परिसरात उतरविला होता. त्यानंतर तो डंपर घेऊन घरी निघाला होता. डंपरमध्ये त्याने मद्य प्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी काटेला अटक केली, अशी माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिली.

हेही वाचा >>> खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र का दिले? नेमकं पत्रात काय म्हटलं?

डंपर मालक दोषी का ?

डंपर मालक काटे याला चालक तोटरे मद्य प्राशन करतो, याची माहिती होती. मद्य प्राशन करुन डंपर चालवू नको, याबाबतची सूचना काटे याने देणे अपेक्षित होते. मूळात डंपर चालक मद्य प्राशन करतो, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला कामावर ठेवणे योग्य नव्हते. काटे याच्या निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करत आहेत.

मृतांवर अमरावतीत अंत्यसंस्कार

अमरावतीत पुण्यात मजूरी करण्यासाठी आलेल्यांची परिस्थिती हलाखीची आहे. वाघोलीतील अपघातात विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय २ सर्व रा. अमरावती) यांचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन जाण्यासाठी मजुरांना वाहन उपलब्ध नव्हते. प्रशासनाने त्यांना वाहन उपलब्ध करुन दिले, तसेच त्यांना अमरावतीत जाण्यासाठी बस उपलब्ध करुन दिली. अमरावतीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातातील गंभीर जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Story img Loader