पुणे : मेफेड्रोन विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुबेर उर्फ सुलतान लतीफ खान (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा, मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश ), स्वप्निल बापू शिंदे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा, मूळ रा. वेल्हे, ता. राजगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Warli tribe performed the Pavri dance
Pune Ganeshotsav: पुणेकरांना मिरवणुकीत डीजे-ढोल ताशाच पाहिजे; आदिवासी जमातीच्या पारंपरिक नृत्याला अत्यल्प प्रतिसाद
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
pimpri chinchwad crime news
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार
female cop threaten while clearing stalls for devendra fadnavis visit at dagdusheth ganpati
“तुला आंदेकरच्या ऑफिसला नेऊन दाखवते मी कोण आहे ते”, महिला पोलिसांना विक्रेत्या महिलेने दिली धमकी
youths attacked with weapons in pune over dispute during dancing
पुणे : विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून तरुणांवर शस्त्राने वार – पोलिसांकडून तीन गुन्हे दाखल
Female police officer Angha Dhawale suspended for threatening friend wife Pune news
पुणे: मित्राच्या पत्नीला धमकी देणारी महिला पोलीस निलंबित
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
pune woman suicide marathi news
पुणे: पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे तरुणीची आत्महत्या

हे ही वाचा…शहरबात: गणेशोत्सवातील मद्यबंदी

बिबवेवाडीतील गंगाधाम रस्त्यावर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी खान आणि शिंदे मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान आणि शिंदे यांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ, येवले, संजय गायकवाड, संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमीत ताकपेरे यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा…पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

शहरातील अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात छापा टाकून एकाकडून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल नुकतेच जप्त केले होते.