लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : भांडण करताना हटकल्याने तिघांनी पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निगडीत घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण कांबळे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद प्रकाश साखरे ( वय २६ रा. रावेत), वैभव भाऊसाहेब तुपे ( वय २८, रा. निगडी), अजय बाबासाहेब पोळ ( वय २१, रा. निगडी) यांना अटक करण्यात आली आहे.

pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार कांबळे सहकाऱ्यांसोबत निगडी परिसरात गस्त घालत होते. आरोपी आपसात भांडण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, आरोपींनी पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यांनी कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ‘पोलिसांना खूप माज आला आहे’ असे म्हणत एका पोलिसाचे बोट पिरगळले.

आणखी वाचा-पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रमोद आणि वैभव यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. शिवाय, ‘तुमच्या सगळ्यांना बघून घेतो, तुमच्या सगळ्यांना कामाला लावतो’ अशी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करित आहेत.

Story img Loader