पुणे : मद्यप्राशन करुन वाहने चालविणारया मद्यपींना सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात समुपदेशाासाठी बोलाविण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खास शैलीत मद्यपी वाहनचालकांना इशारा दिला. ‘पुन्हा मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यास कडक कारवाई करण्यात येईल’, असा दम त्यांनी मद्यपी वाहनचालकांना दिला.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबािरात मद्य प्राशन करनु वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केलेले एक हजार वाहनचालक उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव याव वेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘मद्यप्राशन करुन वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. दोष नसताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. मद्यपी वाहनचालकांच्या चुकांमुळे एखाद्याचे कुटुंब उद्ववस्त होते. मद्यप्राशन करुन वाहने चालवू नयेत. वाहन चालविल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.
पुन्हा मद्यप्राशन करुन वाहने चालविण्याचे धारिष्ट्य कोणी करणार नाही, हे लक्षात ठेवावे. संकेतस्थळ, समाज माध्यमात मद्यपी वाहनचालकांची छायाचित्रे प्रसारित केली जातील. मित्र, कुटुंबीयांना ही छायाचित्रे पाठविली जातील. भर चौकात मद्यपी वाहनचालकाांचा पोलिसांच्या शैलीत खास सत्कार करण्यात येईल, याची जाणीव ठेवावी.’
वर्षभरात सहा हजार मद्यपीं वाहनचालकांवर कारवाई
‘गेल्या वर्षी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध सहा हजार जणांविरुद्ध कारवाई (ड्रंक अँड ड्राईव्ह) करण्यात आली. यापुढील काळात कारवाई तीव्र करण्यात येणार आहे’, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
समाजात संदेश देण्याचे काम करावे
‘समुपदेशन शिबिरात सहभागी झालेल्या वाहन चालकांना शिक्षा देण्याचा उद्देश नाही. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भाेगावे लागतात, याबाबतचा संदेश देण्याचे काम वाहन चालकांनी करावे. भारतात दरवर्षी साधारणपणे एक लाख ८० हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. आकडेवारीचा विचार केल्यास दररोज ४०० नागरिक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात, याचा विचार करणे गरजेचे आहे’, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी नमूद केले.
दर आठवड्याला समुपदेशन शिबिर
अशा प्रकारचे समुपदेशन शिबिर दर् आठवड्याला घेण्यात येणार आहे. भरधाव वेागने वाहन चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्यांचा परवाना जप्त केला जाणार आहे. प्रसंगी त्यांचे वाहनही जप्त केले जाईल. या शिबिरास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्यांचा परवाना दिला जाणार आहे.
शहरातील गंभीर स्वरुपाचे अपघात कमी करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. शहरातील ३० टक्के गंभीर अपघात अवजड वाहनांमुळे होतात. शहराच्या मध्यभागात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुढील आठवड्यात अपघात करणारे अवजड वाहनचालक आणि वाहन मालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

