दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज आयुषचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला सन्मान!

या धाडसी कामगिरीबद्दल आयुषचे सर्वत्र कौतुक होत आहे

जिगरबाज आणि धाडसी कामगिरी करणाऱ्या १३ वर्षीय आयुष गणेश तापकीरचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करत, त्याचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे. काल (सोमवार) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोसरी पसरिरात असणाऱ्या तलावात बुडत असलेल्या तीन मुलांना मोठ्या हिंमतीने व स्वतःचा जीव धोक्यात घालून आयुषने बाहेर काढले होते. मात्र यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांचा जीव वाचला. या धाडसी कामगिरीबद्दल आयुषचे सर्वत्र कौतुक होत असताना, आज पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याच्या धाडसाचे कौतुक करत, त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली. 

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेले चार मित्र बुडाले, यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांचा आयुषमुळे जीव वाचला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. सूरज अजय वर्मा (वय- १२) आणि ओमकार प्रकाश शेवाळे (वय- १३) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत. तर, संदीप भावना डवरी (वय- १२), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय- १४) अशी आयुषने जीव वाचलेल्या मुलांची नावं आहेत. हे सर्वजण गवळी चाळ चक्रपाणी वसाहत भोसरी येथील आहेत. 

१३ वर्षीय आयुषने दिले दोन मुलांना जीवदान; तलावात बुडताना वाचवले

भोसरी येथील सदगुरू नगर, जुना कचरा डेपो येथे तलाव आहे. तिथे सोमवारी दुपारी ऋतुराज, संदीप, मयत ओमकार आणि सूरज हे चौघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोहताना चौघांना तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांनी आरडाओरडा केला. जवळच म्हैस चारण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय आयुषने जीवाची परवा न करता तिघांना पाण्याबाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, तिथे ओमकारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police commissioner krishna prakash honors jigarbaaj ayush who saved the lives of both msr 87 kjp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी