पुणे : रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून ३२ लाख रुपयांचे दागिने चोरून कारागिर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत  असित पोरिया (वय ४२ रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल. मुकेश पंखीरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला. पोरिया यांची रविवार पेठेत श्रीकृष्ण गोल्डस्मिथ पेढी आहे. सराफ बाजारातील व्यावसायिक वेगवेगळे प्रकारचे दागिने घडविण्याचे काम पोरिया यांना देतात. त्यांच्या पेढीत आरोपी पाल, पंखीरा कारागिर होते.

हेही वाचा >>> घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई

OBC leader Laxman Hake, Laxman Hake,
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ प्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
fir registered against five including mumbai builder for cheating housing investors
सदनिकेच्या नावाखाली २१ कोटींची फसवणूकप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा, ३५ जणांची फसवणूक केल्याचा आरोप
police arrested accused who forced women for prostitution
चोर समजून अल्पवयीन भावंडांची धिंड, विलेपार्लेतील घटना; चार ते पाच संशयितांविरोधात गुन्हा
Relief to Mohit Kamboj in fraud case loss of Rs 103 crore case closed
फसवणुकीप्रकरणी मोहित कंबोज यांना दिलासा, १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे प्रकरण बंद
Crimes against two boards in Dhankawadi for causing noise pollution by using high-powered loudspeakers
विसर्जन मिरवणूकीत ‘आव्वाज’; धनकवडीतील दोन मंडळाविरुद्ध गुन्हे
Lure of job in ISRO, Lure of job in NASA,
नागपूर : इस्र, ‘नासा’मध्ये नोकरीचे आमिष; ६ कोटींनी फसवणूक
BJP MLA Munirathna Naidu
BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

पोरिया यांच्या पेढीला सराफ बाजारातील एका नामांकित सराफी पेढीकडून  ३३ मंगळसूत्र घडविण्याचे काम देण्यात आले होते. त्यांना सराफी पेढीकडून सोन्याची ण्देण्यात आली होती. दररोज रात्री काम झाल्यानंतर पोरिया सोन्याचे मोजमाप करायचे. कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. पाल आणि पंखीरा सराफी पेढीतील एका कप्यात ठेवलेले सोने घेऊन पसार झाले. पाल आणि पंखीरा पेढीतून पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. तेव्हा कप्यात ठेवलेले साेने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोरिया यांनी चौकशी केली. तेव्हा पाल आणि पंखीरा सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी सराफी पेढीतील कारागिरांनी सोने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.