scorecardresearch

न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पसार होण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला, वीस फूट उंचीवरुन उडी मारुन आरोपीला पकडले

पोलिसांनी वीस फूट उंचीवरुन उडी मारुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले

accused attempt to escape from the court premises
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून आरोपीने पसार होण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून आरोपीने पसार होण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी वीस फूट उंचीवरुन उडी मारुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले. दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : दुहेरीकरणामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द ; काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल 

न्यायालयाने जाधव याच्या विरुद्ध वाॅरंट बजावले होते. वॉरंट रद्द करण्यासाठी जाधव न्यायालयात आला होता. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयात सुनावणी सुरू असताना जाधव न्यायालयीन कक्षातून पळाला आणि वीस फूट उंचीवरुन उडी मारली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. न्यायालयाने जाधव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जाधव याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात अली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 16:20 IST