लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: सातव्या वाढदिवशी ५१ किलो मीटर सायकलवर सी.एम.ई., खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी असे करत पुणे दर्शन करणाऱ्या रिआन चव्हाण याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद विक्रम नोंदविला आहे. रिआन हा पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांचा मुलगा आहे.

रिआनचा लहानपणापासून साहसी खेळाकडे कल झुकलेला आहे. अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले व नेहमीच मनात येईल तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी ट्रेक करत असतो. रनिंग मध्ये सहा मॅरेथॉन पाच किलोमीटरच्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत.

आणखी वाचा- नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमिलाने घेतली पंतप्रधानांची भेट

पिंपरी-चिंचवड येथील पाच किलोमीटर मॅरेथॉन ३४ मिनिटात पूर्ण केलेली आहे. स्पोर्ट्स फोर ऑल २०२२ या अंडर आठ वर्षे वयोगटात ५० मीटर रनिंग मध्ये तीसरा नंबर पटकावून ब्रांच मेडल मिळवलेले आहे. तो केंद्रीय विद्यालय देहूरोड नंबर एक या शाळेत दुसरीत शिकत आहे. रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक पदावर तर आई डॉ. अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspectors seven year old sons bicycle ride is recorded in the india book of records pune print news ggy 03 mrj
First published on: 21-03-2023 at 18:03 IST