पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (२२ मे) होणाऱ्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली आहे. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून रविवारी सकाळपासून स्वारगेट परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा : “राज साहेबांचं लग्न झालं असतं आणि ते सासरी गेले असते तर…”, दिपाली सय्यद यांचं प्रत्युत्तर

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी अटी घातल्या आहेत. ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत. घोषणाबाजी करू नये तसेच सभेला येणाऱ्यांनी सभेला येताना किंवा सभा संपल्यानंतर वाहन फेऱ्या काढू नयेत, यासह विविध अटींवर सभेला परवानगी देण्यात आली असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police permit mns chief raj thackeray public meeting with some terms pune print news pbs
First published on: 21-05-2022 at 23:26 IST