scorecardresearch

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सांकेतिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मैत्रिणीला सोबत घेऊन पोलीस पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे त्याच पोलीस ठाण्यात पत्नीची तक्रार घेण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. आरोपी त्यांच्यावर दबाव आणत होता. अखेर भोसरी एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहावं लागणार आहे.

या प्रकरणी पीडितेने आरोपी पोलीस पती नितीन कैलास औटी आणि नियंत्रण कक्षात क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या आसावरी आपटे हिच्या विरोधात भोसरी MIDC पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी नितीन आणि पीडितेचा हा दुसरा विवाह आहे. आरोपी पोलीस कर्मचारी नितीन याचा याअगोदर प्रेमविवाह झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पीडितेचा आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर संसारात ढवळाढवळ केल्याचा आरोप

काही महिन्यांपूर्वी पोलीस कर्मचारी नितीन औटी हा पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य इमारतीत कार्यरत होता. तेव्हा, त्याची क्लार्क आसावरीसोबत मैत्री झाली. ते दोघे भोसरी एमआयडीसीमधील घरी यायचे. त्यावेळी आरोपी आसावरी आपल्या संसारात ढवळाढवळ करायची, असा आरोप मारहाण झालेल्या पीडित महिलेने केला आहे.

घरात लपून बोलणं ऐकल्यानंतर पतीकडून मारहाण

पीडित महिला म्हणाली, “२८ मार्च २०२२ रोजी आसावरी माझ्या पतीसह घरी आली. तेव्हा मी घरातच लपले आणि त्यांचं बोलणं ऐकलं. त्यानंतर ते घराबाहेर पडताच मी घराबाहेर आले. याची माहिती मिळताच पतीने मला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.” पीडितेला त्यांच्या बहिणीने रुग्णालयात नेलं. या मारहाणीत पीडितेला मुकामार लागलाय.

हेही वाचा : VIDEO: ….अन् पुन्हा वेशांतर करून कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई, आरोपीकडून नांगरे पाटलांच्या नावाचाही गैरवापर

या घटनेनंतर सर्वसामान्यांना न्याय देणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police personal beat wife with the help of police woman friend in pune kjp pbs

ताज्या बातम्या