scorecardresearch

Premium

पत्र्याच्या खोलीत भेसळयुक्त तूप करण्याचा उद्योग; पोलिसांचा छापा; ७०० किलो तूप जप्त

भेसळयुक्त तूप तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या एकाला पाषाण परिसरात पकडले.

adulterated ghee in the letter room
पत्र्याच्या खोलीत भेसळयुक्त तूप करण्याचा उद्योग; पोलिसांचा छापा; ७०० किलो तूप जप्त (प्रतिनिधिक छायाचित्र)

पुणे : भेसळयुक्त तूप तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या एकाला पाषाण परिसरात पकडले. पाषाणमधील एकनाथनगर भागात पत्र्याच्या खोलीत भेसळयूक्त तूप तयार करण्याचा उद्योग सुरू होता. चतु:शृंगी पोलिसांनी छापा टाकून तेथून सातशे किलो भेसळयुक्त तूप जप्त केले.

सांगसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाषाण परिसरातील एकनाथनगर भागात पत्र्याच्या खोलीत राजपूतने भेसळयुक्त तूप तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक बाबा दांगडे, इरफान मोमीन यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. याबाबतची माहिती पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रुपेश चाळके, बाबा दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे आदींनी ही कामगिरी केली.

Municipality's move to start Daighar Waste Project
डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेच्या हालचाली; पालिकेची संबंधित ठेकेदाराला नोटीस
grain rice scam
धान्य घोटाळा : निकृष्ट तांदूळ पुरवठा करणाऱ्या सहा गिरण्या काळ्या यादीत, जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..
traders plot of 1000 sqft rehabilitation project onion potato market apmc vashi
कांदा व्यापाऱ्यांना हजार फुटांचे गाळे? मोफत गाळ्यांसाठी निधी उभारणीची धडपड
heavy rains in Bhandara district after long hiatus rivers canals and lake are overflowing
भंडाऱ्यात पावसाचे दमदार पुनरागमन, वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police raided the industrial premises of adulterated ghee in the room pune print news rbk 25 amy

First published on: 03-10-2023 at 23:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×