police registered a case against three for threatening teen girl with acid attack pune print news rbk 25 zws 70 | Loksatta

पुणे: तरुणीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; प्रभात रस्ता परिसरातील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा

याबाबत एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ओंकार शिंगारे तरुणीच्या ओळखीचा आहे.

पुणे: तरुणीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी; प्रभात रस्ता परिसरातील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी डेक्कन जिमखाना भागात परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ओंकार शिंगारे, सागर शिंगारे यांच्यासह त्यांच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ओंकार शिंगारे तरुणीच्या ओळखीचा आहे.

हेही वाचा >>> पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष

ओंकार हा तरुणीचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत होता. ओंकारने तरुणीला प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकावले होते. प्रभात रस्ता परिसरातून निघालेल्या तरुणीला त्याने अडवले. प्रेमसंबंधास नकार दिल्याने चिडलेल्या ओंकारने तरुणीवर ॲसिड टाकून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी सागर आणि त्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारु, अशी धमकी तरुणीला दिली. पोलीस उपनिरीक्षक कवटीकवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 13:26 IST
Next Story
पुणे : विद्यापीठाला तीन वर्षांसाठी सेट परीक्षेसाठी मान्यता