scorecardresearch

पुणे : नैराश्यातून घर सोडलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांकडून शोध ; आत्महत्येपासून परावृत्त करीत मनपरिवर्तन

आत्महत्येपासून परावृत्त करत या महिलेचे मनपरिवर्तन केले. लष्कर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

पुणे : नैराश्यातून घर सोडलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांकडून शोध ; आत्महत्येपासून परावृत्त करीत मनपरिवर्तन
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : दुर्धर आजार तसेच आर्थिक नुकसानामुळे नैराश्यातून आयुष्य संपविण्यासाठी घर सोडून गेलेल्या डॉक्टर महिलेचा पोलिसांनी काही तासांत शोध घेतला. आत्महत्येपासून परावृत्त करत या महिलेचे मनपरिवर्तन केले. लष्कर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.

डॉ. शिल्पा (नाव बदलेले आहे.) या ४९ वर्षाच्या असून, त्या एमबीबीएस आहेत. लष्कर परिसरातील एका रुग्णालयात त्या प्रॉक्टीस करतात. त्यांना एक मुलगा आहे. पती खासगी नोकरी करतात. त्यांना दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे त्या मानसिक तणावात असत. आजाराने त्यांना मोठा आर्थिक भार पडत होता. त्यातून तीन ते चार लाखांचे कर्ज देखील झाले आहे. नैराश्यातून त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत फोन बंद केला. मुलाने तत्काळ घरी धाव घेतली. परंतु, आई घरी दिसत नसल्याने शोध घेतला. त्यावेळी घरात दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यात ‘मला दुर्धर आजार झाला असून, यावर होणारा खर्च आणि आधी मी केलेले कर्ज यामुळे मी मानसिक तणावात आहे’ असा उल्लेख चिठ्ठीत होता. मुलाने या चिठ्ठ्या पाहून तत्काळ लष्कर पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. लष्कर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड तसेच उपनिरीक्षक कांबळे, अमोल गायकवाड, गणेश कोळी, समीर तांबोळी, कैलास चव्हाण, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने या महिलेचा शोध सुरू केला. त्यांचा मोबाइल बंद होता. परिसरातील सर्व हॉटेल्सची तपासणी केली. त्यातून ही महिला नाना पेठेतील एका हॉटेलात सापडली. तिला सुखरूप ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. नैराश्यातून बाहेर काढत महिलेचे मतपरिवर्तन केले. कुटुंबासोबत तिला घरी पाठविण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या