पिंपरी- चिंचवड: हिंजवडीत कामावर निघालेल्या कामगाराच्या टेम्पो ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचं बोललं जात असतानाच आता तो घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत काही वेळातच पोलीस सविस्तर माहिती देणार आहेत. या घटनेमध्ये चार कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. घातपातामध्ये चालकाचा सहभाग असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितल आहे.
बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडीतील फेज वन च्या जवळच भरधाव टेम्पो ट्रॅव्हल ने पेट घेतला होता. ट्रॅव्हल्स मधून चालकाने उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला होता. इतर काही जणांनी देखील स्वतःला वाचवण्यासाठी धावत्या ट्रॅव्हल्स मधून उड्या घेतल्या होत्या. याच दरम्यान चार जणांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये आतापर्यंत सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेत जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे.