लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मद्यपान केलेल्या व्यक्तीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. इथले (चिंचवड) आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते तेच बघतो अशी धमकी दिल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

याप्रकरणी विजय साठे (वय ५१, रा. माकन चौक, जुनी सांगवी) याला पोलिसांनी अटक केले आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-सिंहगड रस्ता भागात वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार, गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद; तीन अल्पवयीन ताब्यात

पोलीस अंमलदार पाईकराव आणि पोलीस अंमलदार गुव्हाडे हे सांगवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. मंगळवारी दुपारी ते हद्दीत गस्त घालत होते. जुनी सांगवी येथे एका वृद्ध महिलेला मदतीची गरज असल्याने पाईकराव आणि गुव्हाडे महिलेच्या मदतीला गेले. मदत करत असताना साठे तिथे आला. त्याने मद्यपान केले होते. पोलिसांना धक्का देऊन ढकलून दिले. अश्लील शिवीगाळ करत तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते तेच बघतो. माझ्या ओळखीचे इथले आमदार आहेत, अशी धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader