राष्ट्रवादीकडून ‘विकासाची पोलखोल’ स्पर्धा, भाजपकडून ‘आघाडीचे काम दाखवा’ स्पर्धा

पुणे : महापालिके च्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर एकमेकांना उघडे पाडण्याची स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लागली आहे. विकासाचा दावा करणाऱ्या महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरात विकासकामे केली नाहीत हे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाची पोलखोल ही स्पर्धा जाहीर के ल्यानंतर भाजपनेही त्याला प्रत्युत्तर देत राज्यातील महाविकास आघाडीचे काम दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा, या स्पर्धेची घोषणा के ली.

शहरात विविध प्रकारची विकासकामे के ल्याचा दावा करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात बहुतांश ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. त्यांचा हा विकासाचा दावा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पोलखोल पुणे हा हॅशटॅग वापरून फे सबुक, ट्वीटर तसेच इन्स्टाग्रामवर समस्या दर्शवणारे छायाचित्र स्वत:च्या छायाचित्रासह (सेल्फी), चित्रफितीसह पाठवावे असे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांसह, कचरा, रस्ते, सांडपाणी, वाहतूक या संबंधीच्या समस्या या माध्यमातून कळविण्यात याव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी के ले आहे.

यातील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी ११ हजार १०१ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. १७ ते २७ ऑगस्ट या कालावधीत  ही स्पर्धा होणार आहे. यातून भाजपचा विकासाचा दावा किती फोल आहे, हे स्पष्ट होईल, असे जगताप यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले काम दाखवा रोख बक्षीस मिळवा, या स्पर्धेची घोषणा के ली आहे. दीड वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी एकही भरीव विकासकाम के लेले नाही. राज्यात भाजप सत्तेत असताना पुणे शहरात अनेक मोठी कामे झाली. याचीच भीती राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठीच ही स्पर्धा भाजपने घेतली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीने शहरासाठी के लेली कामे ९९२२७४४६४४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर कळवावीत. योग्य उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे मुळीक यांनी सांगितले.