scorecardresearch

‘सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, यंत्रणेतील दोष दूर करा’

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यंत्रणेत दोष असल्यास ते दूर करावेत.

पिंपरी : नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यंत्रणेत दोष असल्यास ते दूर करावेत. जनसंवाद सभेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांचे समाधान झाले पाहिजे, याकडे प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जनसंवाद सभेत बोलताना केले.
शहरातील नागरिक आणि प्रशासनात सुसंवाद राखण्याच्या दृष्टीने तसेच तक्रारींचे निराकरण जलदगतीने करण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांत जनसंवाद सभा सुरू केल्या. त्याअंतर्गत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनसंवाद सभेत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
वाघ म्हणाले, नागरिकांनी केलेल्या तक्रारवजा सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचे उत्तर वेळेत द्यावे. गंभीर तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबद्दल त्यांना माहिती द्यावी. जनतसोबत जिव्हाळय़ाचे नाते निर्माण करण्याची ही नामी संधी आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
तक्रारींचा पाऊस : संरक्षणपात्र झोपडय़ांच्या हस्तांतरणाबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, रस्त्यावरील अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करावी, पालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे, सार्वजनिक सुलभ शौचालयांमध्ये जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था करावी, पालिकेच्या आरक्षित जागेवर नामफलक लावावेत, तुटलेले ड्रेनेजचे चेंबर्स आणि इतर वाहिन्यांची दुरुस्ती करावी, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, रस्त्यांची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावी, धोकादायक वृक्षांची छाटणी करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या प्रमाणपत्रधारक व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे, उंच भागावर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, आदी तक्रारीवजा सूचना जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Positive outlook fix system flaws public meeting through amy

ताज्या बातम्या