पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असून, वाढत्या मागणीमुळे महिनाभरात कांदा दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलोदरम्यान आहेत.

  महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी असते. कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे पीक नोव्हेंबपर्यंत येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यात कांद्याची लागवड चांगली होते. मात्र, प्रतवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील कांद्याचा दर्जा परराज्यातील कांद्याच्या तुलनेत चांगला असतो. दसरा-दिवाळी या कालावधीत कांद्याला मागणी वाढते. महिनाभरात परराज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचतील, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट

गेल्या काही महिन्यांपासून कांदा दर स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, जामखेड, संगमनेतर भागातून ५० ट्रक कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ८० ते १३० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १८० ते २०० रुपये दर मिळाले होते. राज्यात कांदा लागवड चांगली झाली आहे, असे पोमण यांनी नमूद केले.

निर्यातीत घट : कांदा निर्यातीत घट झाली आहे. दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यातून सध्या महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. पावसाळी आणि थंड वातावरणामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे सध्या वखारीत साठवणूक केलेला कांदा शेतकरी मोठय़ा प्रमाणावर विक्रीस पाठवत आहेत. बांगलादेश तसेच आखाती देशात होणारी कांद्याची निर्यात कमी प्रमाणावर होत आहे.