महापारेषण कंपनीच्या लोणीकंद येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात तातडीची अत्यावश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी (२६ जून) सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी आणि इतर परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापारेषणच्या अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रामध्ये वीज पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रिक दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. हे काम रविवारी (२६ जून) करण्याचे नियोजन आहे. या कामामुळे महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या एकूण सहा वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

त्यामुळे या कालावधीत लोणीकंद, वाघोली, मांजरी, फुलगाव, आवलवाडी, संघर वेअर हाऊस आणि तुळापूर, भावडी, जगताप वस्ती, बायफ रस्ता, लोहगाव रस्ता, आवलवाडी रस्ता, साई सत्यम पार्क, उबले नगर परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. या अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power cut tomorrow wagholi lonikanda repair work mahatrans power substation pune print news amy
First published on: 25-06-2022 at 16:49 IST