scorecardresearch

यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब; पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसीला फटका

महापारेषणच्या चाकण आणि लोणीकंद अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला.

यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब; पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसीला फटका
यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब; पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसीला फटका(संग्रहित छायाचित्र)

महापारेषण कंपनीच्या चाकण आणि लोणीकंद या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रातील यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरासह शिवाजीनगर, औंध, बाणेर, बालेवाडी, गणेशखिंड परिसरात ४५ मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या गावांमध्ये दीड तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता.

हेही वाचा >>>पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद

महापारेषणच्या चाकण आणि लोणीकंद अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. यामुळे महापारेषणच्या चिंचवड, भोसरी एक व दोन, टेल्को, रहाटणी, एनसीएल आणि गणेशखिंड या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणच्या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला. मात्र, महापारेषणकडून तातडीने तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने या सर्व उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर महावितरणकडून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

हेही वाचा >>>“स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”

या दरम्यान पिंपरी विभागांतर्गत पिंपरी आणि चिंचवड परिसर, हिंजवडी, खराळवाडी, सांगवी या परिसरात सुमारे पाऊण तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. भोसरी विभाग अंतर्गत आकुर्डी, बी-ब्लॉक, थॅरमॅक्स चौक, भोसरी, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, देहूगाव, तळवडे या परिसरात सुमारे ४० मिनिटे, तर भोसरी एमआयडीसी, इंद्रायणीनगर, भोसरी गावठाण, एस व ए ब्लॉक, चऱ्होली, डुडुळगाव, नाशिक रोड या परिसरात ११ ते २० मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. शिवाजीनगर विभाग अंतर्गत शिवाजीनगरचा काही भाग, गणेशखिंड, औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात देखील सुमारे २० ते ३० मिनिटे वीजपुरवठा बंद राहिला. राजगुरुनगर विभागांतर्गत चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसी व लगतच्या काही गावांमध्ये सुमारे सव्वा ते दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये चाकण एमआयडीसीच्या काही भागात नारायणगाव अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:24 IST

संबंधित बातम्या