‘महावितरण’च्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रभाकर शिंदे यांची ‘महावितरण’च्या संचालकपदी (प्रकल्प) थेट भरतीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
शिंदे हे तत्कालीन राज्य विद्युत मंडळात १९८१ कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर नाशिक व जळगाव येथे त्यांनी विविध पदांवर काम कले. शिंदे यांची जून २००८ मध्ये मुख्य अभियंतापदी निवड झाली. त्यांनी भांडार व चाचणी विभागाचे मुख्य अभियंता म्हणून मुख्य कार्यालयात काम केले. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून जून २०१० ते मे २०१३ पर्यंत ते कार्यरत होते. त्यानंतर १३ मे पासून शिंदे हे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आता ‘महावितरण’चे संचालक (प्रकल्प) म्हणून ते मुंबईतील मुख्यालयात रुजू होणार आहेत.