scorecardresearch

‘वंचित’मुळे ‘मविआ’चा उमेदवार पडल्याचा आरोप चुकीचा, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

prakash ambedkar
प्रकाश आंबडेकर (संग्रहित फोटो)

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. पण, वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केला. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय हा रवींद्र धंगेकर यांचा आहे. तो विजय पक्षाचा आहे असे मी मानत नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे जर उभे राहिले नसते तर राहुल कलाटे निवडून आला असता असं का म्हणत नाही? त्यामुळे वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 01:14 IST
ताज्या बातम्या