पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात सहा उड्डाणपुलांचे नियोजन

पुणे : आगामी वर्षांच्या अंदाजपत्रकासाठी (२०२२-२३) महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये उड्डाणपूल, रस्ते विकसनाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात सहा उड्डाणपूल वर्षभरात करण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नियोजित केले असून त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पायाभूत सुविधांच्या उभारणीबरोबरच रखडलेले रस्ते मार्गी लावण्याचे प्रस्तावित आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी ८ हजार ५९२ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना सादर केले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेस गटनेता आबा बागुल, शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यावेळी उपस्थित होते. या अंदाजपत्रकामध्ये पुढील वर्षभरासाठी विविध विभागांना तरतूद करण्यात आली असून नदीसुधार योजना आणि मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेची कामे वर्षभरात सुरू करण्यात येणार आहेत.

अंदाजपत्रकाची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे

पाणीपुरवठा विभाग

(तरतूद- १ हजार ४१५.८९ कोटी)

  • जायका प्रकल्प
  • जायका प्रकल्पीय योजनेचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
  • मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण
  • समाविष्ट ११ गावांसाठी सांडपाणी वहन व्यवस्था आणि प्रक्रिया उपाययोजना

समान पाणीपुरवठा

  • अनधिकृत नळजोड शोधून कारवाई
  • ६५ ठिकाणी साठवणूक टाक्या कार्यान्वित
  • ४०० किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था
  • १.५ लक्ष जलमापक बसविणे

मलनिस्सारण

(तरतूद-९२५.३० कोटी)

  • विविध व्यासाच्या सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठी १५५ कोटींची तरतूद
  • ४० किलोमीटर लांबीची कामे प्रस्तावित
  • नालेसफाई, पावसाळी वाहिन्या साफसफाईसाठी ५०.७५ कोटींची तरतूद
  • सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये विविध सुधारणा

घनकचरा व्यवस्थापन

(तरतूद-८२८.७७ कोटी)

  • ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प
  • शास्त्रोक्त भू-भराव उभारणे
  • कॅन्टोन्मेंट येथील प्रकल्प क्षमता १०० टनाने वाढविणे
  • समाविष्ट गावांतील जागा ताब्यात घेऊन प्रक्रिया प्रकल्पांचे नियोजन

नगरनियोजन

  • मेट्रो टीओडी झोनमधील रहिवाशांना पार्किंगमध्ये सवलत
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे
  • प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १२० कोटींची तरतूद

आरोग्य

(तरतूद-४०९.२१ कोटी)

  • करोना संसर्ग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना
  • आरोग्य सेवा-सुविधांचे बळकटीकरण
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना
  • शहरी गरीब योजनेसाठी ६० कोटींची तरतूद
  • अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी अर्थसाहाय्य

शिक्षण (तरतूद-प्राथिमक ४९५.८८ कोटी, माध्यमिक शिक्षण ७५.८१ कोटी)

  • शालेय इमारतींमधील स्वच्छतागृहांची यांत्रिकी स्वच्छता
  • डीबीटी योजनेसाठी आर्थिक तरतूद
  • विनामूल्य पाठय़पुस्तके, गणवेश, बसपास सुविधा
  • विविध अर्थसाहाय्य योजना ल्ल गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न
  • विद्यार्थी गळती रोखण्यासाठी उपाययोजना

उद्यान

(तरतूद-१०९.८५ कोटी)

  • पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित
  • बृहत आराखडय़ानुसार राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे काम

पीएमपी

(तरतूद-४३३.१९ कोटी)

  • बसताफा २३६० करण्याचे नियोजित
  • ई-बस खरेदीसाठी निधी
  • संचलन तूटची रक्कम
  • पाचशे ई-बसच्या ताफ्याचे नियोजन

विद्युत

(तरतूद-२९९.३८ कोटी)

  • समाविष्ट गावांत विद्युत व्यवस्था उभारणी
  • पथदिव्यांसाठी भरीव तरतूद
  • एलईडी दिवे बसविण्याला प्राधान्य

अमृत योजना, स्मार्ट सिटी

  • अमृत प्रकल्पांसाठी दहा कोटींची तरतूद
  • लाईट हाऊस नव्याने सुरू करण्याचे नियोजित

भवन रचना

(तरतूद-३४४.७५ कोटी)

  • कोथरूड येथे बालनाटय़गृह उभारणे
  • यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाची विस्तारीकरणाची कामे
  • वारजे येथे प्रसूतिगृह-रुग्णालय प्रस्तावित
  • आरक्षित जागांवर आरोग्य केंद्रांची उभारणी
  • प्लेसमेकिंग अंतर्गत नानाविध कामे
  • कोथरूड येथे शिवसृष्टी
  • नगर वाचनालय येथे सिटी लायब्ररी
  • बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण

वाहतूक नियोजन आणि प्रकल्प

(तरतूद-६६९.८० कोटी)

  • विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल
  • कल्याणीनगर-कोरेगांव पार्कला जोडणारा पूल
  • नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी २७५ कोटींची तरतूद
  • संगमवाडी-येरवडा, औंध-बाणेर येथे पथदर्शी प्रकल्प
  • येरवडा-मुंढवा नदीकाठ विकसन
  • पीपीपी धर्तीवर डीपी रस्ते
  • खराडी बाह्यवळण येथे उड्डाणपूल
  • जुन्या पुलांची दुरुस्ती
  • साधू वासवानी ते बंडगार्डन एकात्मिक वाहतूक आराखडा
  • करिश्मा चौक ते कर्वे पुतळा उड्डाणपूल
  • सनसिटी-कर्वेनगर नदीवरील पूल
  • पाषाण-पंचवटी ते कोथरूड भागाला जोडणारा बोगदा

पथ विभाग

(तरतूद-८५६.५६ कोटी)

  • आंबिल ओढय़ावरील अकरा पुलांची कामे
  • एकात्मिक सायकल योजनेअंतर्गत १० किलोमीटरचा मार्ग
  • पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम अंतर्गत नव्याने पाच रस्त्यांची पुनर्रचना ल्लबालभारती-पौड रस्त्याला गती

ई-व्हेईकल चार्जिग स्थानकांची उभारणी पीपीपी धर्तीवर रस्ते आणि पुलांची कामे