गर्भात मुलगी असल्याच्या संशयावरून गरोदर पत्नीला मारहाण, महिलेचा गर्भपात

मुलगा होईल की मुलगी यावरून वाद विकोपाला

संग्रहित छायाचित्र

गर्भात मुलगी असल्याच्या संशयावरून पतीने त्याच्या गरोदर पत्नीला मारहाण केली. तिच्या पोटावर लाथा आणि बुक्के मारले. यामुळे या महिलेचा गर्भपात झाला. पिंपरी चिंचवडच्घया वाकड भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सासरे मोहन सिधाराम जावीर यांनी वाकड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तर या महिलेचा पती प्रकाश विठ्ठल केंगार याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या घटनेत पीडित पत्नी मनोरुग्ण झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२०१४ मध्ये पीडित महिलेचा आणि आरोपी प्रकाश विठ्ठल केंगार यांचा विवाह झाला होता.त्यानंतर काही वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली,आता या मुलीचे वय दोन वर्षे आहे. ती मुलगी असल्याने तिच्या पालन पोषणासाठी आरोपी प्रकाश हा सासऱच्या व्यक्तीकडे पैश्यांची मागणी करत होता.

तसेच वेळोवेळी पत्नीचा मानसिक,शाररिक,छळ करत होता त्याचबरोबर मारहाण देखील करत. दुसऱ्यांदा पीडित महिला ही गर्भवती राहिली होती, मात्र तिला पुन्हा मुलगी होणार या संशयावरून तिला नेहमी मारहाण होत होती,सद्य स्थितीला पीडित महिला ही साडेतीन महिन्याची गर्भवती असताना दोघात मुलगी होणार की मुलगा यावरून भांडण झाले आणि आरोपी पती प्रकाश याने गर्भावर लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली,याच मारहाणीत पत्नीचा गर्भपात झाला.

या सगळ्या प्रकाराचा या महिलेच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने पीडित महिला ही मनोरुग्ण झाली आहे.तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आरोपी प्रकाश केंगार हा एका बँकेचे कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. याप्रकरणी प्रकाश केंगार ला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pregnant woman assaulted by her husband faces abortion

ताज्या बातम्या