पुणे : पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन ; चित्रपटाला किमान एक हजार वर्षाचे आयुष्य | Preservation of Gandhi film by PIQL technology pune print news amy 95 | Loksatta

पुणे : पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन ; चित्रपटाला किमान एक हजार वर्षाचे आयुष्य

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे जतन करण्यासाठी ‘पीआयक्यूएल’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.

पुणे : पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन ; चित्रपटाला किमान एक हजार वर्षाचे आयुष्य
पीआयक्यूएल तंत्रज्ञानाद्वारे गांधीजींच्या चित्रपटाचे जतन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे जतन करण्यासाठी ‘पीआयक्यूएल’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. गांधी फिल्म फाउंडेशनतर्फे नाॅर्वे येथील पीआयक्यूएल तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ एमएम फिल्म जतन करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न असून याद्वारे चित्रपटाला किमान एक हजार वर्षांचे आयुष्य लाभणार आहे. 

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद

गांधी फिल्म फाउंडेशनच्या मणिभवन येथील कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पीआयक्यूएलचे प्रतिनिधी रमेश बजाज यांनी या संग्रहित चित्रफिती गांधी फिल्म्स फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन पोद्दार यांच्याकडे सुपूर्द केल्या. फाउंडेशनचे विश्वस्त उज्ज्वल निरगुडकर विश्वस्त, सुभाष जयकर या वेळी उपस्थित होते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हजार वर्षांहून अधिक काळ चित्रपटांचे जतन केले जाणार आहे. चित्रपटाच्या प्रिंट्सची दुसरी प्रत नॉर्वेमधील पीआयक्यूए च्या ‘आर्क्टिक वर्ल्ड आर्काइव्ह’मध्ये शून्य तापमानात जतन केली जाईल. उज्ज्वल निरगुडकर यांनी या योजनेची सुरुवात 
केली असून  सुभाष जयकर यांनी गांधींजींच्या जीवनावर आधारित दोन चित्रपट जतन करण्यासाठी निवडले. भारतातील पीआयएलक्यू चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीश मेहरा यांनी या प्रकल्पासाठी नॉर्वेशी समन्वय साधला. गांधीजींच्या जीवनाशी संबंधित दोन चित्रपट जतन केले गेले आहेत. पहिला चित्रपट १४ मिनिटांचा डॉक्युमेंटरी फिल्म स्वरूपातील आहे. यामध्ये लंडन येथील राउंड टेबल कॉन्फरन्स, लंडनमधील गोलमेज परिषद तसेच गांधींच्या स्वित्झर्लंड आणि इटलीच्या भेटींचा समावेश आहे. तर, दुसरा चित्रपट १२ मार्च १९३० रोजी गुजरातमधील नौखली येथे झालेल्या मिठाच्या आंदोलनाविषयीचा असून तो अकरा मिनिटांचा आहे. 

हेही वाचा >>> पुणे : नृत्य कलाकाराच्या घरातून आठ लाखांचा ऐवज लंपास ; कात्रज भागातील घटना

गांधीजींच्या जीवनावरील या चित्रफिती मौल्यवान असून आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. हे जतन केले नसते तर आपण अमूल्य राष्ट्रीय संपत्तीला मुकलो असतो. – नितीन पोद्दार, अध्यक्ष, गांधी फिल्म्स फाउंडेशन

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड ; ग्रामीण भागात रोहित्र चोरीचे १२ गुन्हे उघड

संबंधित बातम्या

“घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
निष्ठावंतांची काँग्रेसला गरज नाही का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज
आरोग्य वार्ता : कर्करोगावरील उपचारात मुली मागे
ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात