पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) दीक्षांत संचलन आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालयास (एएफएमसी) भेट देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लष्कराच्या सर्वोच्च प्रमुख या नात्याने राष्ट्रपती मुर्मू लष्कराच्या या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू संचलन सोहळ्यास उपस्थित राहून त्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारतील.

हेही वाचा >>> आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा; बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रबोधिनीची ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने ‘एनडीए’च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण संस्थेने आजवर तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविण्याबरोबरच मित्र देशातील प्रशिक्षणार्थींनाही लष्करी प्रशिक्षण दिले आहे. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयानेही (एएफएमसी) आपल्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले आहे. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम होत असून वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी ‘एएफएमसी’ला ‘प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. त्या निमित्त ‘एएफएमसी’मध्ये १ डिसेंबर रोजी हाेणाऱ्या कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader