पुणे : पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई | Preventive action against six workers of Popular Front of India pune print news amy 95 | Loksatta

पुणे : पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले.

पुणे : पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
( संग्रहित छायचित्र )

पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले.अब्दुल अजीज बन्सल (रा. सुसवाली कॅाम्प्लेक्स, कोंढवा), माज फैजान शेख, मोहम्मद कैस अन्वर शेख (दोघे रा. अशोका म्युज, कोंढवा), काशीफ नजीर शेख (रा. अशोक सुमीत सोसायटी, नुराणी कब्रस्तानजवळ, कोंढवा), दिलावर करीम सैय्यद (रा. युफोरिया सोसायटी, कोंढवा), आयमूल रशीद मोमीन (रा. एक्सेल होम्स सोसायटी, कोंढवा) अशी कारवाई करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

हेही वाचा >>>पुणे : गॅस सिलिंडरमधून गळती स्फोटात महिला जखमी ; नऱ्हे भागातील घटना

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोंढवा भागात कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन घोषणाबाजी केली. पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन करुन सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 15:30 IST
Next Story
पुणे : गॅस सिलिंडरमधून गळती स्फोटात महिला जखमी ; नऱ्हे भागातील घटना