राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : उन्हाळय़ामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून लागवड कमी प्रमाणावर झाली आहे. कोिथबिरीला मोठय़ा प्रमाणावर मागणी असून किरकोळ बाजारात एका जुडीची विक्री प्रतवारीनुसार ३० ते ५० रुपये दराने केली जात आहे. मेथीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपये असून इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.

pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (२९ मे) पुणे विभागातून दीड लाख जुडी कोिथबिरीची आवक झाली तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. उन्हाळय़ामुळे पालेभाज्यांची लागवड कमी प्रमाणावर होत असून प्रतवारीवर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात कोिथबिरीच्या शेकडा जुडीला प्रतवारीनुसार १५०० ते २५०० रुपये असा दर मिळाला आहे. मेथीच्या शेकडा जुडीला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले आहे. घाऊक बाजारात कांदापात, चाकवत, करडई, अंबाडी, राजगिरा, चुका, चवळई, पालकाचे दर तेजीत आहेत. कोिथबीर, मेथीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.  घाऊक बाजारात पालेभाज्यांचे दर तेजीत असून किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना जादा पैसे देऊन पालेभाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. परिणामी किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.

उन्हाळय़ामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, बाजार कर आदी बाबींचा विचार केल्यास किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.

प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

बाजारात पुणे विभागासह लातूर, नाशिक परिसरातून कोिथबिरीची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत कोिथबिरीची आवक कमी प्रमाणावर होत आहे. अन्य पालेभाज्यांच्या तुलनेत कोंथिबीर, मेथीला मागणी जास्त आहे. पावसाळय़ात नवीन पालेभाज्यांची लागवड होईल. त्यानंतर दरात घट होईल.

अमोल घुले, अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड