scorecardresearch

Premium

पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले आहेत.

pune metro
पीएमआरडीएचे शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि स्वारगेट ते सासवड या मार्गांचे प्रस्ताव आहेत. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच संस्था या मार्गांचे काम करेल हे निश्चित करण्यात आले. आता हे मार्ग फायदेशीर ठरतील की नाही, हे तपासण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार नेमण्याचे पाऊल उचलले आहे. सल्लागारांचा अहवाल आल्यानंतर या मार्गांवर मेट्रो उभारणी कोण करणार, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पीएमआरडीएचे शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि स्वारगेट ते सासवड या मार्गांचे प्रस्ताव आहेत. पीएमआरडीएने या मार्गांचा प्रकल्प विकास आराखडा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयार करून घेतला होता. याचवेळी महामेट्रोचा खडकवासला ते खराडी हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यात खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि हडपसर ते लोणी काळभोर या टप्प्यांचा समावेश आहे. महामेट्रोने या मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा खासगी सल्लागार संस्थेकडून तयार करून घेतला होता. दोन्ही संस्थांनी महापालिकेकडे हे प्रकल्प विकास आराखडे सादर केले होते. पीएमआरडीए आणि महामेट्रोचे प्रस्तावित मेट्रो मार्ग स्वारगेट-पूलगेट-हडपसरपर्यंत समान आहेत. पुढे दोन्ही मार्ग लोणी काळभोरपर्यंत जात आहेत. त्यामुळे जवळपास समान मार्गांवर दोन्ही संस्थांनी आराखडे तयार केले आहेत.

Samruddhi highway
Samruddhi Highway: बड्या उद्योग समुहाकडून समृद्धीलगत रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक
Thane metro
ठाण्यात अंतर्गत मेट्रोची गरज का? महापालिकेकडून कोणता प्रस्ताव?
flood situation in Bhandara district after wainganga river crosses danger level
भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती, आंतरराज्यीय मार्गासह १८ मार्ग वाहतुकीसाठी बंद
state government approves expansion of metro 2 b line to cheeta camp
‘मेट्रो २ ब’ची धाव आता मंडाळेऐवजी चिता कॅम्पपर्यंत, मार्गिकेचा १.०२३ किमीने विस्तार करण्यास राज्य सरकारची मंजुरी, २०५ कोटींनी खर्च वाढणार

आणखी वाचा-गणेशोत्सवात मोकाट जनावरांचा अडथळा; मालकांवर दंडात्मक कारवाईचा महापालिकेचा निर्णय

पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत विभागीय आयुक्तांनी एकत्र येत असलेल्या मार्गांवर एकाच संस्थेने काम करावे, असे निर्देश दिले होते. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) करण्यासाठी सल्लागार नेमण्याची सूचना त्यांनी पीएमआरडीएला केली होती. त्यानुसार, या मार्गाची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची पावले पीएमआरडीएने उचलली आहेत. यात त्या मेट्रो मार्गांच्या उत्पन्नासोबत इतर माध्यमातून मिळू शकणारा महसूलही पाहिला जाणार आहे.

महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्याकडून दोन समान मेट्रो मार्गांचे प्रकल्प विकास आराखडे तयार करण्यात आले होते. पुमटाच्या बैठकीत एकच संस्था हे काम करेल, हे निश्चित करण्यात आले. आर्थिक व्यवहार्यता तपासून पीएमआरडीए हे काम करण्याचा निर्णय घेईल. त्यांनी हे काम न केल्यास महामेट्रो ते करेल. -अतुल गाडगीळ, संचालक (कार्य), महामेट्रो

आणखी वाचा-यंदा पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये?

महामेट्रोने स्वारगेट ते पूलगेटपर्यंत मेट्रो मार्गाचे काम करावे आणि रामवाडीपासून पुढे मगरपट्ट्यापर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करावा, असा प्रस्ताव आहे. तिथून पुढे पीएमआरडीएला लोणी काळभोर आणि सासवडपर्यंत मेट्रो मार्गांचे काम करता येऊ शकते. सल्लागार नेमून या मार्गांची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. -रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Problem of metro lines in pune pmrda and mahametro looking for same routes pune print news stj 05 mrj

First published on: 20-09-2023 at 12:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×