scorecardresearch

पुण्यात भामा खेड प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

पुण्यात भामा खेड प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आधी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुणे शहराची ताकद गिरीश बापट अशा घोषणा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांना उत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दादा-दादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाच्या आधी भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2021 at 19:07 IST

संबंधित बातम्या