पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अठरा शैक्षणिक विभागांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अहवाल तयार केला आहे. एकात्मिकता आणि शाश्वतता या दोन मूलभूत तत्त्वांवर हा अहवाल बेतलेला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे येत्या काळात विकास धोरण ठरवण्यासाठी हा अहवाल राजकीय नेते, शासनाला सादर करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच या अहवालाचे प्रकाशन झाले. जून २०२१ मध्ये डॉ. करमळकर यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ धोरण संशोधन व विश्लेषण प्रकल्प: सिंधुदुर्ग विकास अहवालह्ण हा प्रकल्प सुरू करण्यात आला. पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्राणिशास्त्र, मानवशास्त्र, भूगोल, स्त्री अभ्यास केंद्र, शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार, कौशल्य विकास केंद्र, ऊर्जा अभ्यासप्रणाली केंद्र, ललित कला केंद्र, आरोग्यशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र, लिबरल आर्ट्स इंटरडीसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स आदी अठरा विभागांचा या प्रकल्पात सहभाग होता. जिल्ह्याच्या विकासासाठीची ध्येयधोरणे ठरवत असताना अनेकदा ती दुय्यम माहितीवर (सेकंडरी डेटा) आधारलेली असतात. मात्र ही धोरणे लोकहितासाठी अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी धोरणे प्राथमिक माहितीवर (प्रायमरी डेटा) आधारलेली असावीत, या दृष्टिकोनातून हा अहवाल तयार करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Production sindhudurg district development report study departments pune university ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST