महाराष्ट्र सोडून इतर राज्यात प्रकल्प जाणे खुप दुर्दैवीची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत. हा विषय राजकीय न करण्याची राज्य सरकारला विनंती आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हेही वाचा >>>पुणे : विद्यापीठातील वीजपुरवठा खंडित ; परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना त्रास

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Who Are Bjp 23 Candidates in maharashtra ?
Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ?

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून खासदार सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. विविध विषयांबाबत पुण्यातील सिंचन भवन येथे आल्यानंतर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘या विषयावर राजकारण करणे चुकीचे आहे. सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढल पाहिजे. प्रकल्प कुठल्याही राज्यात जायला हरकत नाही, मात्र महाराष्ट्रातून तो गेल्याचे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरोघरी भेटी बंद करून इकडे लक्ष द्यावे आणि इतर दौरे रद्द करून या गंभीर प्रश्नावर चर्चा करावी. हा प्रकल्प राज्यातून गेल्याने जवळपास एक लाख नोकऱ्या जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे.

दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी खासदार सुळे यांच्या नेत्तृत्त्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राला गंभीर मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमावेत. तसेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दिल्लीपुढे न झुकण्याची महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे. मात्र, शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होत असून ही नवी संस्कृती येत आहे. महाराष्ट्राचे हे लोण देशभर पसरत आहे, अशी टीकाही सुळे यांनी या वेळी केली.

हेही वाचा >>> पुणे : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून हॅाटेलमध्ये गोळीबार ; मुंढव्यातील घटना

युवा सेनेचेही आंदोलन

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात युवा सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. एक लाख ५८ हजार कोटींची गुंतवणूक आणि एक लाख तरूणांचा रोजगार पळवून नेल्याबद्दल राज्य सरकारचा या वेळी निषेध करण्यात आला.