scorecardresearch

पिंपरी- चिंचवडमधील मालमत्तांना मिळणार ‘युपीक आयडी’

महापालिकेच्या वतीने नवीन मालमत्ता, वापरात बदल, वाढीव बांधकामाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांना युपीक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड ) म्हणजेच विशिष्ट मालमत्ता क्रमांक देण्यात येणार आहे.

Pimpri-Chinchwad municipal corporation
महापालिकेच्या सर्व सेवा आणि एकत्रित महसूल मिळण्यासाठी या युपीक आयडीचा वापर होणार आहे.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या वतीने नवीन मालमत्ता, वापरात बदल, वाढीव बांधकामाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांना युपीक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड ) म्हणजेच विशिष्ट मालमत्ता क्रमांक देण्यात येणार आहे. महापालिका सेवा, शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी या युपिक आयडीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मालमत्तेची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

महापालिका हद्दीत सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सतरा झोनपैकी वाकड, पिंपरीनगर आणि भोसरी झोनमध्ये मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. थेरगाव, पिंपरी वाघेरे आणि चिखली भागात मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी स्थापत्य कन्सल्टंट एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-बालिकेशी अश्लील कृत्य करणारा अटकेत; कोथरुड परिसरात घटना

सर्वेक्षणात प्रत्येक मालमत्तेला युपीक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेफिकेशन कोड) देण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व सेवा आणि एकत्रित महसूल मिळण्यासाठी या युपीक आयडीचा वापर होणार आहे. हा आयडी कोड देताना मालमत्ता अथवा एकही जागा वगळली जाणार नाही. हे करतानाच मालमत्तांना अचूक आणि ओळीने क्रमांक देण्यात येत आहेत. तसेच अचूक पत्ता, अचूक मोजमापे, मालमत्तांचे फोटो, नकाशे इत्यादी नागरिकांना जाग्यावरच दिले जाणार आहेत. या सर्वेक्षणात सदनिकेचे अंतर्गत मोजमाप करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांना सदनिका किती कारपेटची आहे, काही तफावत आहे का? हेही तपासता येणार आहे.

आणखी वाचा-पुणे: एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

असा असेल ‘युपीक आयडी’!

शहरात सतरा झोन आहेत. नागरिकांना आपला झोन कोणता हे लक्षात रहात नव्हते. त्यामुळे यामध्ये महत्वाचा बदल करण्यात आला असून वाकडला डब्ल्यूकेडी, भोसरीला बीएसआर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे हे मालमत्ता धारकांच्या लक्षात राहणे सोपे झाले आहे. पहिली तीन अक्षरे झोनच्या नावाची आद्याक्षरे म्हणजे (वाकडाला डब्ल्यूकेडी, भोसरीला बीएसआर, आकुर्डी एकेडी, थेरगाव टीआरजी), दोन आकडे गटाचे, दोन आकडे गट (ब्लॉक), दोन आकडी इमारत क्रमांक आणि शेवटी मालमत्तेचा तीन आकडी क्रमांक असणार आहे. तसेच सर्च पर्यायांमध्ये मालमत्ता कोड किंवा मोबाईल नंबर येईल.

नागरिकांना आपल्या मालमत्तेची अचूक माहिती ठेवता येण्यासाठी, करांमधील असमानता दुरुस्त करण्यासाठी या सर्वेक्षणाचा लाभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणाठी सहकार्य करावे. -नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त , कर संकलन व कर आकारणी

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×