‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन वाढीचा प्रस्ताव

राज्यात १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येच्या आधारे एकूण सीएचबी प्राध्यापकांची ८ हजार ९४९ पदे रिक्त आहेत.

पुणे : राज्यात घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने राज्य शासनाला दिला आहे. राज्य शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास प्राध्यापकांना वाढीव दरानुसार मानधन मिळू शकणार आहे.

सीएचबी प्राध्यापकांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्याने सीएचबी प्राध्यापक नियुक्तीची पद्धत बंद करून समान काम समान वेतन राबवण्याची नेट-सेट-पीएच.डी. धारक उमेदवारांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे. राज्यात ५ नोव्हेंबर २००८च्या शासन निर्णयानुसार सीएचबी प्राध्यापकांना प्रति तास ३०० रुपये, प्रात्यक्षिकासाठी १५० रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार ५०० रुपये आणि ६०० रुपये प्रतितास, २०० रुपये प्रात्यक्षिकासाठी अशी वाढ करण्यात आली. तर आता ६२५ रुपये आणि ७५० रुपये प्रति तास आणि २५० रुपये, ३०० रुपये प्रात्यक्षिकासाठी अशी वाढ प्रस्तावित आहे.

राज्यात १ ऑक्टोबर २०१७च्या विद्यार्थी संख्येच्या आधारे एकूण सीएचबी प्राध्यापकांची ८ हजार ९४९ पदे रिक्त आहेत. त्यातील १ हजार ४९२ प्रत्यक्ष नियुक्त पदे आहेत, तर सद्य:स्थितीत ७ हजार ४५७ पदे रिक्त आहेत. एका रिक्त पदासाठी दोन सहायक प्राध्यापक नियुक्?त केल्यास सीएचबी प्राध्यापकांची संख्या १५ हजारांवर जाणार आहे. तसेच मानधन वाढीमुळे ५१ कोटी ५१ लाख ६० हजार इतका कमाल आर्थिक भार राज्य शासनावर पडणार असल्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रस्तावात नमूद के ले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Proposal for increase in honorarium for chb professor akp

ताज्या बातम्या