scorecardresearch

पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीच्या खर्चाला महापालिकेच्या वित्तीय समितीने अद्यापही मान्यता न दिल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात
(संग्रहित छायाचित्र) :लोकसत्ता

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्यासाठीच्या खर्चाला महापालिकेच्या वित्तीय समितीने अद्यापही मान्यता न दिल्याने हा प्रस्ताव धूळ खात पडला असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पादचारी दिनाचे आयोजन करणारी देशातील पहिली महापालिका असा गाजावाजा करणाऱ्या महापालिकेची यानिमित्ताने पादचाऱ्यांबाबत असलेली असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जलधर आराखडे; भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील ५१ ठिकाणी पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामांसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पादचारी सिग्नल बसविण्यासाठी वित्तीय समितीमध्ये प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले. मात्र अद्यापही वित्तीय समितीची मंजुरी न मिळाल्याने यंदा पादचारी सिग्नल सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा >>>पुणे: बहुपडदा चित्रपटगृह चालकांना दिलासा; करमणूक कर वसुलीचा दावा निकाली

जंगली महाराज रस्ता – स. गो. बर्वे चौक, छत्रपती संभाजी महाराज उद्यान प्रवेशद्वार, जंगली महाराज मंदिर, गोपाळकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता)- बीएमसीसी चौक, वैशाली हॉटेल, शिवाजीनगर पोलिस ठाणे, सेनापती बापट रस्ता- सिम्बायोसिस महाविद्यालय प्रवेशद्वार, रत्ना हाॅस्पिटल, राजभवन रस्ता – बालकल्याण संस्था, केंद्रीय विद्यालय, शिवाजी स्कूल औंध गावठाण, लाल बहादूर रस्ता – काका हलवाई समोर, बाजीराव रस्ता – महाराणा प्रताप उद्यान, लेले दवाखाना, फुटका बुरूज, शनिवार वाडा, नूमवी शाळेसमोर, गरवारे बालभवन, सारसबाग, पेशवे पथ – आंबिल ओढा कॉलनी, सोलापूर रस्ता – गाडीतळ हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता मगर रुग्णालय, रवी दर्शन चौक, १५ नंबर सिग्नल, मगरपट्टा मुख्य प्रवेशद्वार, सीझन मॉल सिग्नल, ताडीगुत्ता चौक, पाषाण रस्ता-लाॅयला स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, कर्वे रस्ता- खंडोजी बाबा चौक, शेलार मामा चौक, पूना हॉस्पिटल चौक, गोखले मामा चौक, स्वातंत्र्य चौक, अभिनव चौक, पौड फाटा चौक, हुतात्मा राजगुरू चौक, कर्वे पुतळा चौक, कोकण एक्स्प्रेस चौक, वनदेवी माता मंदिर चौक, कर्वेनगर पूल चौक, खिलारे पाटील रस्ता, पाडळे पॅलेस चौक, एनडीए रस्ता – रमेशभाऊ वांजळे चौक, आंबेडकर चौक, गणपती माथा चौक, शिंदे पूल चौक,पौड रस्ता – पौड फाटा, केळेवाडी चौक, मोरे विद्यालय चौक या ठिकाणी पादाचरी सिग्नल बसविण्याचे प्रस्तावित आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 11:23 IST

संबंधित बातम्या