लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

Mahatma Phule Police raided Kalyan Railway Station arrested 13 prostitutes and four gang leaders
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Prostitution under name of massage parlor raid on massage parlor on Sinhagad road
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सिंहगड रस्त्यावरील मसाज पार्लरवर छापा
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Police Bust Prostitution Racket At massage Parlour
स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक
spa massage centers running sex rackets in city
धक्कादायक! उपराजधानीत अनेक ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार…
case has filed against four women for prostitution in Navle Pool
नवले पूल परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय, नागरिकांच्या तक्रारीनंतर चार महिलांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी मसाज पार्लरचा चालक सताउद्दिन मोहम्मद दिलावर हुसेन (वय २२, रा. जुनी सांगवी) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील बेकायदा व्यवसाय, जुगार, मटका अड्डे, तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आदेश धुडकावून काही जण बेकायदा व्यवसाय करत असून, बाणेर भागात ‘मून थाई स्पा येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.

आणखी वाचा-पुणे : पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

मसाज पार्लरचा चालक तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader