कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक |Prostitution under name massage center Koregaon Park Two people arrested crime branch pune | Loksatta

कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी हुसेन आणि उदिल यांना अटक करण्यात आली.

कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
संग्रहित छायाचित्र

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरचा व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली.अमिर अबुसुबन हुसेन (वय २२), नवाज लालूमियाँ उदिल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार अजय राणे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क भागातील अवयान स्पा ज्वेल या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी हुसेन आणि उदिल यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 

संबंधित बातम्या

पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
‘तात्या कधी येता, वाट पाहतोय’; अजित पवारांचा मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री
पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे आभासी चलनाद्वारे आठ कोटी ३० लाखांची खंडणीची मागणी
आधार कार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारायचा का? मुख्याध्यापकांचा शिक्षण आयुक्तांना प्रश्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा
बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा