राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसकडून राजभवनासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेस, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. राज्यपाल कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असताना युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: पुण्यात तडीपार गुंडांचा वावर; दोन गुन्हेगार अटकेत, पिस्तुलासह तीक्ष्ण शस्त्रे जप्त

‘राज्यपाल हटवा’ म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे राहुल शिरसाठ यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार ,स्वप्नील नाईक, राजाभाऊ ठोंबरे, अजित ढोकळे, वाहिद निलगर, उमेश पवार, रोहन सुरवसे, सुजित गोसावी, आशुतोष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by youth congress in front of raj bhavan showing black flags pune print news amy
First published on: 02-12-2022 at 16:08 IST